मोन : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोन जिल्ह्यातील ओटिंग भागात लष्करी कारवाईत १३ नागरिकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागालँड पोलिसांनी एका अधिका-यासह २१ पॅरा स्पेशल फोर्सच्या ३० कर्मचा-यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
नागालँडचे पोलिस प्रमुख टी जॉन लाँगकुमर यांनी ही माहिती दिली. या संदर्भात अगोदरच ३० कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे आरोपपत्र सहाय्यक सरकारी वकील यांच्यामार्फत सादर करण्यात आले.