26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयमेहुल चोक्सीसह पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मेहुल चोक्सीसह पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेकडून १३,००० कोटी रुपयांच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी, त्याची पत्नी प्रीती आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. अधिका-यांनी सोमवारी ही माहिती दिली.

चोक्सीची पत्नी प्रीती प्रद्योत कुमार कोठारीविरुद्ध ईडीने दाखल केलेले हे पहिलेच आरोपपत्र असून, ईडीने चोक्सीच्या पत्नी प्रीती यांच्या विरोधात गुन्ह्याची रक्कम लपवण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत दाखल केलेले आरोपपत्र मार्चमध्ये मुंबईतील विशेष न्यायालयासमोर ठेवण्यात आले होते आणि न्यायालयाने सोमवारी त्याची दखल घेतली.

चोक्सी दाम्पत्याव्यतिरिक्त एजन्सीने चोक्सीच्या गीतांजली जेम्स लिमिटेड, गिली इंडिया लिमिटेड, नक्षत्र ब्रँड लिमिटेड आणि पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक (ब्रॅडी हाऊस शाखा, मुंबई) गोकुलनाथ शेट्टी यांचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे. यापूर्वी ईडीने २०१८ आणि २०२० मध्ये चोक्सीविरोधात दोन आरोपपत्र दाखल केले असून, आज दाखल करण्यात आलेले हे चोक्सीविरुद्धचे तिसरे आरोपपत्र आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या