34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeउद्योगजगतआता देशभर लागू होणार चेक ट्रंकेशन व्यवस्था; चेक वटविण्यामधील अडथळे दूर होणार

आता देशभर लागू होणार चेक ट्रंकेशन व्यवस्था; चेक वटविण्यामधील अडथळे दूर होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : रिझर्व्ह बँक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत देशातील सर्व बँकांच्या सर्व शाखांमध्ये चेक ट्रंकेशन व्यवस्था सुरू करणार आहे. यामुळे चेक क्लीअरिंग प्रक्रियेचा वेग वाढणार आहे. चेक (धनादेश) लवकर वटवले जाणार आहेत. चेकद्वारे आर्थिक व्यवहार करणाºयांना यामुळे दिलासा मिळणार आहे. देशभर चेक ट्रंकेशन लागू झाले तर कोणालाही चेकने पैसे दिल्यास संबंधित व्यक्तीला रक्कम लवकर मिळणार आहे. अनेकजण एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेशी संबंधित बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी चेक देतात. चेक ट्रंकेशन व्यवस्थेमुळे चेकने दिलेले पैसे संबंधित बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया लवकर होणार आहे.

बहुसंख्य चेकची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा होण्यासाठी किमान २ ते ४ दिवसांचा कालावधी लागतो. काही चेकची रक्कम जमा होण्यासाठी यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रामुख्याने चेक ग्रामीण भागातून जमा झाला असेल तर क्लीअंिरगला वेळ लागतो. मात्र चेक ट्रंकेशन व्यवस्था लागू झाल्यानंतर बहुसंख्य चेक २४ तासांत क्लीअर होतील. चेकची रक्कम बँक खात्यात २४ तासांत जमा होईल. याच कारणामुळे रिझर्व्ह बँक लवकरच देशातील सर्व बँकांच्या सर्व शाखांमध्ये चेक ट्रंकेशन व्यवस्था सुरू करण्यावर भर देत आहे.

सध्याच्या परंपरागत व्यवस्थेत बँकेच्या शाखेत आलेला चेक बँकेच्या क्लीअरिंग हाऊसकडे जमा होतो. क्लीअरिंग हाऊस सीटीएस अर्थात चेक ट्रंकेशन सिस्टिमचा वापर करुन देशातील सर्व बँकांच्या संपर्कात राहते आणि चेक क्लीअरिंगची प्रक्रिया पूर्ण होते. ज्या व्यक्तीने चेक जमा केला आहे़ त्याच्या बँक खात्याची नोंद आणि ज्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत़ त्या खात्याची नोंद यांची पडताळणी केल्यानंतर चेक वटवला जातो. चेक वटवल्यानंतर संबंधित खात्यात पैसे जमा होतात.

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या घोषणेनुसार चेक ट्रंकेशन या व्यवस्थेत प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेत विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने एक व्यवस्था कार्यरत केली जाईल. चेकचा फोटो काढून तो आॅनलाइन पद्धतीने बँकेच्या शाखेतून सीटीएस अर्थात चेक ट्रंकेशन सिस्टिमकडे पाठवला जाईल. ज्या व्यक्तीने चेक जमा केला आहे़ त्याच्या बँक खात्याची नोंद आणि ज्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत त्या खात्याची नोंद यांची पडताळणी होईल. चेकवर नमूद खाते क्रमांक तसेच बँकेशी संबंधित सर्व कोड यांची तपासणी फोटोच्या मदतीने वेगाने केली जाईल. आॅनलाइन यंत्रणेमुळे कामाचा वेग वाढेल.

सध्या देशातील निवडक बँकांच्या १ लाख ५० हजार शाखांमध्ये चेक ट्रंकेशन ही व्यवस्था कार्यरत आहे. अद्याप वेगवेगळ्या बँकांच्या जवळपास १८ हजार शाखांमध्ये चेक ट्रंकेशन सुरू झालेले नाही. रिझर्व्ह बँक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत देशातील सर्व बँकांच्या सर्व शाखांमध्ये चेक ट्रंकेशन व्यवस्था सुरू करणार आहे. याआधी सप्टेंबर २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेने १२१९ क्लीअरिंग हाऊस बंद करुन सर्व बँकांच्या माध्यमातून चेक ट्रंकेशन सुरू केले. ज्या शाखेत चेक ट्रंकेशन नाही त्या शाखेतील चेक जवळच्या चेक ट्रंकेशन असलेल्या शाखेकडे पाठवायचे आणि क्लीअरिंग पूर्ण करायचे अशी पद्धत अंमलात आणण्यास सुरुवात झाली. आता रिझर्व्ह बँक देशातील सर्व बँकांच्या सर्व शाखांमध्ये चेक ट्रंकेशन व्यवस्था ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू करणार आहे. यामुळे चेक क्लीअरिंगसाठी लागणारा वेळ एकदम कमी होणार आहे. चेक ट्रंकेशन व्यवस्थेमुळे प्रत्येक चेक क्लीअरिंगसाठी खर्च होणारा वेळ, पैसा आणि मानवी श्रम यांची बचत होणार आहे.

आयकर परताव्याच्या नावाखाली होणा-या फसवणुकीत वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या