24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयभारताकडून ‘छेल्लो शो’ चित्रपटाचा ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश

भारताकडून ‘छेल्लो शो’ चित्रपटाचा ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुजराती सिनेमा छेल्लो शो हा भारताकडून ऑस्कर २०२३ साठी अधिकृत एन्ट्री असणार आहे. गुजरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. ऑस्करच्या शर्यतीत राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाची चर्चा होती, पण आता हा सिनेमा या शर्यतीतून मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने पुढील वर्षी होणा-या अ‍ॅकेडमी अ‍ॅवॉर्डसाठी अर्थात ऑस्करसाठी गुजराती सिनेमा छेल्लो शो ची निवड केली आहे.

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या कॅटेगिरीसाठी भारताकडून हा सिनेमा पाठवण्यात येणार आहे. पान नलिन दिग्दर्शित या सिनेमात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीणा, दीपेन रावल आणि परेश मेहता हे प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचा प्रिमियर २०२१ मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये छेल्लो शो नं ६६ व्या वैलाडोलिड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन स्पाईक अ‍ॅवॉर्ड जिंकला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या