24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयछत्रपती शिवाजी महाराज टेंगा खो-यात विराजमान

छत्रपती शिवाजी महाराज टेंगा खो-यात विराजमान

एकमत ऑनलाईन

टेंगा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आता अगदी देशाच्या ईशान्येकडील अरुणाचलपर्यंत पोहोचली आहे. येथील टेंगा खो-यात तैनात असलेल्या १ मराठा लाईट इन्फंट्री तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला आहे.

सीमेचे रक्षण करण्यासाठी तैनात जवानांना त्यांच्याकडून लढण्याची ताकद आणि प्रेरणा मिळत राहो, यासाठी मराठा चौकात हा पुतळा स्थापित केला असून तो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

स्थानिकांना महाराजांबाबत माहिती व प्रेरणा मिळावी यासाठी हा पुतळा उभारण्यात आला असून हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतर्ळा १२ फूट उंच असून याचे वजन सुमारे २०० किलो आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या