25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeराष्ट्रीयछोटा राजन जिवंत आहे; त्या वृत्तानंतर एम्सच्या अधिका-यांचा खुलासा

छोटा राजन जिवंत आहे; त्या वृत्तानंतर एम्सच्या अधिका-यांचा खुलासा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचारादरम्यान राजनवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी राजनचा मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र काही वेळातच एएनआयने एम्समधील सुत्रांच्या हवाल्याने राजन जिवंत असल्याचे म्हटले आहे.

तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या कोरोनाची लागण झाली. त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असे आधी तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र लक्षणे दिसल्यानंतर छोटा राजनची कोरोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला. यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले. मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. २६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.

एप्रिलच्या मध्यात तुरुंग क्रमांक दोनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर छोटा राजनमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे या तुरुंगातील कैद्यांना वेगळे ठेवले गेले आहे, असे तुरुंग प्रशासने स्पष्ट केले आहे.

कुवेतवरून २१५ टन ऑक्सिजन घेऊन तीन युद्धनौका रवाना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या