24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री अमरिंदर सिंग : भारत-चीन युद्ध झाल्यास पाकिस्तानही सहभागी होईल

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग : भारत-चीन युद्ध झाल्यास पाकिस्तानही सहभागी होईल

एकमत ऑनलाईन

अमृतसर (वृत्तसंस्था) : लडाखमध्ये गलवान खो-यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसेला दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्णच आहेत. मागील दोन महिन्यांपासून सुरु असणा-या चर्चेमध्ये या विषयावर काहीच तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भारत आणि चीनदरम्यान युद्ध झाले तर त्यामध्ये पाकिस्तानही सहभागी होईल असं मत व्यक्त केलं आहे. १९६२ च्या युद्धामध्ये चीनला ज्याप्रकारे भारताने उत्तर दिलं होतं त्याच प्रकारे भारताने आताही चीनला दणका दिला पाहिजे असं मत सिंग यांनी व्यक्त केलं आहे.

‘चीनबरोबर भारताचे युद्ध झालं तर पाकिस्तान या युद्धामध्ये उडी घेईल. चीनचे सैनिक पहिल्यांदाच गलवान खो-यात आलेत अशातली गोष्ट नाहीय. सन १९६२ रोजीही ते गलवानमध्ये आले होते. मात्र सत्य हे आहे की त्यावेळी त्यांचा समाना करण्यासाठी आपण अधिक चांगल्या परिस्थितीमध्ये होते. सध्या त्या ठिकाणी आपण लष्काराच्या १० ब्रिगेड तैनात केल्या आहेत. या भागामध्ये आपण भारतावर हल्ला करु शकतो असा चीनचा समज असेल तर तो त्यांचा बावळटपणा ठरेल. १९६७ साली ज्यापद्धतीने रक्तरंजित झटापटी झाली होती तसंच पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असं मत सिंग यांनी व्यक्त केलं.

चीन तिबेटच्या पठारापासून ते हिंदी महासागरापर्यंत आपला वावर आणि प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे असंही सिंग यांनी म्हटलं आहे. चीनचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहता भारताने आपले लष्करी सामर्थ्य अधिक मजबूत करण्याची गरज आहे असंही सिंग यांनी म्हटलं आहे. ‘चीन हिमाचल प्रदेशमधील काही भूभागाची मागणी करत आहे. ते सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील काही भागांची मागणी करतायत. आपण हे सर्व लष्करी ताकदीच्या जोरावरच थांबवू शकता हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण शक्तीशाली असून तर समोरचा एखादा निर्णय घेण्याआधी अनेकदा विचार करेल,’ असं मत सिंग यांनी व्यक्त केलं.

लातूर-नांदेड मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांचा मनसेकडून सत्कार

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या