नवी दिल्लीः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आदराने ‘रोडकरी’ म्हटले जाते. परंतु देशपातळीवर त्यांच्या खात्याचे वाभाडे एका पत्रामुळं निघाले आहेत. याच पत्राची आज देशभर चर्चा आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी आज केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी चेन्नई ते राणीपेट या राष्ट्रीय महामार्ग ४ च्या दूरवस्थेबद्दल लिहिलं आहे. रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की मला माझ्या काही जिल्ह्यांना ट्रेनने भेटी द्याव्या लागल्या” असं मुख्यमंत्री एमके स्टालिन म्हणाले आहेत. ते पुढे म्हणातात, तामिळनाडू सरकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करत नाही, असं म्हणणं चुकीचं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदार दयानिधी मारन यांनी या रस्त्याच्या दूरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. या रस्त्यामुळे आपल्याला ट्रेनने प्रवास करावा लागल्याचं स्टालिन यांनी सांगितले. देशभर नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक होत असतांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खात्यावर आणि त्यांच्या कामकाजावर आक्षेप घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.