23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना शिरच्छेद करण्याची धमकी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना शिरच्छेद करण्याची धमकी

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या धमकीबद्दल मुरादाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणारी पोस्ट मिळाली आहे. फेसबुकवर मुरादाबाद पोलिसांच्या नावाने एक फेक पेज तयार करण्यात आले असून त्यावरून अशा पोस्ट करण्यात आल्या आहेत. आत्मप्रकाश पंडित नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्मप्रकाश पंडित यांचे म्हणणे आहे की, त्यांचे खाते हॅक करून कोणीतरी हे काम केले आहे. एका ट्विटर युजरने ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर यूपी पोलिसांचा सायबर सेल सक्रिय झाला आणि तपास सुरू केला. पोलिस लवकरच योग्य आरोपीपर्यंत पोहोचतील आणि त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

६ आरोपी अटकेत
सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची गेल्या दोन वर्षांत ही ११ वी वेळ आहे. धमकी प्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या क्रमातील पहिली धमकी २४ एप्रिल २०२० रोजी देण्यात आली होती. तेव्हापासून धमक्यांची मालिका सुरूच आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या