33.5 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeराष्ट्रीयमुलांचा ताबा देणे अंतिम आदेश नाही

मुलांचा ताबा देणे अंतिम आदेश नाही

एकमत ऑनलाईन

पाटणा : मुलांचा ताबा देणे हा अंतिम आदेश किंवा किंवा बदलता न येणारा निर्णय नाही. हा निर्णय मुलांच्या गरजेप्रमाणे बदलता येऊ शकतो असे पटना उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पतीने पत्नीला पोटगी म्हणून ५ लाख रुपये द्यायचे आणि मुलीची कस्टडी पतीकडे राहील असे ठरले होते.

त्याप्रमाणे पतीने २०१६ मध्ये पैसे दिले आणि अल्पवयीन मुलीचा ताबा पतीकडे गेला. पण घटस्फोटानंतर मुलीची कस्टडी मागण्यासाठी पत्नीने नंतर याचिका दाखल केली. पतीने याला विरोध केला आणि दिलेले पैसेही परत मागितले. पत्नी आणि तिच्या घरचे आपल्याला त्रास देत असल्याचा त्याने आरोपही केला. त्यानंतर फॅमिली कोर्टाने पत्नीला पतीचे पैसे परत देण्याचे आदेश दिले असून पतीला मुलीची कस्टडी तिच्या आईकडे सोपवण्यास सांगितले आहे.

कस्टडी पत्नीकडे सोपविली
एका घटस्फोटाच्या खटल्यामध्ये फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश राखून ठेवल्याच्या याचिकेवर सुनावणी झाली, त्याबद्दल हे निरीक्षण नोंदवण्यात आले. कोर्टाने याचिकाकर्ता पतीला आपल्या मुलाची कस्टडी पत्नीकडे सोपवण्याचे आदेश दिले. या दोघांचे लग्न २०१० मध्ये झाले होते. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने २०१५ मध्ये घटस्फोट घेतला.

कलमांचा उद्देश मुलांच्या कल्याणासाठी
हिंदू विवाह कायदा, १९५६ च्या कलम २६ अन्वये, न्यायालयाला कार्यवाही प्रलंबित असताना किंवा कायद्यांतर्गत कोणताही हुकूम पारित झाल्यानंतर मुलांचा ताबा, पालनपोषण आणि शिक्षण यासंदर्भात कोणताही आदेश देण्याचा किंवा कोणतीही व्यवस्था करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या कलमांतर्गत दिलेले आदेश वेळोवेळी निरनिराळे, निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकतात. या कलमाचा उद्देश अल्पवयीन मुलांच्या कल्याणासाठी न्याय्य आणि योग्य तरतूद करणे हा आहे असे त्यात म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या