24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयआता एकल पालकत्व पुरूष कर्मचा-यांसाठी चाईल्डकेअर लीव्ह

आता एकल पालकत्व पुरूष कर्मचा-यांसाठी चाईल्डकेअर लीव्ह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचा-यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एकल पालकत्व स्वीकारलेल्या सरकारी सेवेतील पुरूष कर्मचा-यांनाही आता चाईल्डकेअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे.

एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचा-यांना आता आपल्या पाल्याच्या संगोपनासाठी चाईल्डकेअर लीव्हचा लाभ घेता येणार असून, याकरीता त्यांना तसा अर्ज करण्याची मुभा प्राप्त होणार आहे़ केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवार दि़ २६ ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा केली. एकल पालकत्व स्वीकारलेले पुरूष कर्मचारी म्हणजे विधुर, घटस्फोटीत अथवा अविवाहित कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले. तसेच, हा मोठा निर्णय असून, सरकारी कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव सार्वजनिकरित्या हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या वर्षात संपूर्ण चाईल्ड केअर लीव्ह ही भरपगारी रजा म्हणूनही वापरता येईल. तसेच, दुस-या वर्षी भरपगारी रजेच्या ८० टक्केच चाईल्ड केअर लीव्हच्या स्वरूपात वापरता येईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.

या नव्या सुधारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष रस दाखवला होता. त्यामुळेच काही महत्त्वाचे निर्णयही घेता आले. गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात सरकारने अनेक सुधारणा करणारी पावले उचलली आहेत. सरकारी कर्मचा-यांनी उत्तमोत्तम काम करावे हा यामागील उद्देश आहे, असेही जितेंद्र सिंह म्हणाले. तसेच, गेल्या काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सरकारी कर्मचा-यांवर कठोर निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुटीदरम्यान अनेक लाभ
ज्या कर्मचा-यांना सद्यस्थितीत चाईल्डकेअर लीव्ह हवी आहे, अशा कर्मचा-यांची ती सुट्टी यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे. तसेच, कर्मचा-यांना चाईल्ड केअर लीव्हवर असताना लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन चा लाभही घेता येणार आहे.

दिव्यांग बालकासाठी विशेष नियम
याव्यतिरिक्त दिव्यांग बालकांच्या देखभालीसाठीही नियम तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत कोणत्याही कर्मचा-याला कोणत्याही क्षणी चाईल्ड केअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी बालकाच्या वयाची अट ठेवण्यात आली असून, सर्वाधिक वय २२ वर्षे निश्चित करण्यात आले आहेत़

भ्रष्टाचाराची घराणेशाही संपविण्याला प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या