नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि लडाखचा हा भारताचा अविभाज्य भाग असून, भारताच्या अंतर्गत विषयांवर भाष्य करण्याचा चीनला अधिकार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी चीनला फटकारत म्हटले.
भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करण्याचा चीनला कुठलाही अधिकार नाही, असे भारताने आज सुनावले. सीमा भागात भारताकडून सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांवर चीनचा आक्षेप आहे. यावरही भारताने स्पष्ट केले आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि सीमाभागात हा आर्थिक विकास पोहोचवण्यासाठी संपूर्ण देशात पायाभूत विकास आणि सुरक्षेवर भर दिला जात आहे, असे भारताने सांगितले.
इतर देशांनी त्यांच्या अंतर्गत विषयांवर भाष्य करून नये, असे ज्या देशांना वाटते, त्या देशांनीही असे करू नये, असा इशारा श्रीवास्तव यांनी चीनला दिला. अरुणाचलवरही आमची बाजू अगदी स्पष्ट आहे. तो आमचा अविभाज्य भाग आहे. हे तथ्य चीनला उच्च स्तरावर ब-याच वेळा सांगितले गेले आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.
सासु-सास-याच्या घरात राहण्याचा सुनेला अधिकार