31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयचीन, पाक मिळून हल्ल्याची शक्यता - सीडीएस जनरल बिपीन रावत

चीन, पाक मिळून हल्ल्याची शक्यता – सीडीएस जनरल बिपीन रावत

एकमत ऑनलाईन

चीनचे पाकिस्तानला आर्थिक , लष्करी पाठबळ : रावत

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरोधात युद्ध करू शकतात, असा इशारा सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानला मिळत असलेल्या चीनच्या आर्थिक आणि लष्करी पाठबळाकडे आपण अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. पश्चिमेवरील सीमेसह पूर्व सीमेवरही संघर्ष वाढत आहे. यासाठी आपण तयार असले पाहिजे. चिनी सैन्याने अलिकडेच सीमेवर केलेल्या काही आक्रमक कारवाया आमच्या लक्षात आल्या आहेत. त्यांना चोख उत्तर देण्याची क्षमता भारतात आहे, असे रावत म्हणाले.

पाकिस्तानने भारताविरूद्ध छुपे युद्ध छेडले आहे. पण त्यात पाकला कायम अपयशी ठरेल, असे रावत म्हणाले. पाकिस्तान भारताविरूद्ध छुपे युद्ध करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीशिवाय भारताच्या इतर भागातही दहशतवाद पसरवण्याचा पाकचा प्रयत्न आहे. उत्तर सीमेवर भारतासमोर समस्या निर्माण करण्याचा पाकचा डाव आहे. पण त्यात पाक अपयशी ठरेल आणि मोठे नुकसान सहन करावे लागेल, असे रावत म्हणाले.

सीमेवर आम्हाला शांतता हवी आहे. पण अलीकडेच सीमेवर चीनच्या काही आक्रमक कारवाया आमच्या लक्षात आल्या आहेत. त्यांना चोख उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे, असे जनरल रावत यांनी स्पष्ट केले. भारत-अमेरिकेत सामरिक भागीदारीबाबतही जनरल रावत यांनी माहिती दिली. भारत आणि अमेरिकेच्या संबंध उभय देशांमध्ये झालेल्या चर्चेने अधिक बळकट झाले आहेत. दोन्ही देश हिंद प्रशांत महासागराच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार झाला होता. यानुसार भारत अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक अशी अमेरिकन संरक्षण सामग्री घेईल. आता अमेरिकेने सतत संपर्कात राहून माहिती देत राहावी, अशी आमची अपेक्षा आहे, असे जनरल रावत म्हणाले.

दोघांनाही उत्तर देण्याची तयारी
पश्चिम आणि पूर्वेकडील सीमेवर पाकिस्तान आणि चीनचा एकचवेळी हल्ला करण्याच्या धोक्याचा रावत यांनी उल्लेख केला. दोन्ही सीमांवर उत्तर देण्यासाठीच्या तयारीवर आम्ही विचार केला आहे. भारतीय सैन्य दलांनी कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे आणि सोबतच भविष्यासाठीही तयारी ठेवली पाहिजे, असे रावत म्हणाले.

स्वारातीम विद्यापीठात ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या