31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयआंदोलनात चीन-पाकचा हात नाही

आंदोलनात चीन-पाकचा हात नाही

एकमत ऑनलाईन

नागपूर : शेतकरी आंदोलनावर अनेक भाजप नेते टीका करीत आहेत, या आंदोलनात चीन पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे, परंतु शेतक-यांच्या या आंदोलनात चीन पाकिस्तान पोहोचूच शकत नाही, असे एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपाइं (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे स्पष्ट केले. आठवले म्हणाले शेतक-यांना ज्या सुधारणा हव्या असतील, त्या सुधारणा करण्यास सरकार तयार आहे, परंतु कायदाच मागे घ्या, अशी भूमिका बरोबर नाही, सरकार कायदा मागे घेणार नाही, परंतू सुधारणा करण्यास तयार आहे.

त्यासाठी शेतक-यांनीही सरकारशी संवाद साधण्यास पुढे यावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. शेतकरी कायदे हे शेतक-यांच्या हिताचेच आहेत. थंडीमध्ये शेतकरी आहेत़ हे आम्हालाही चांगले वाटत नाही, सरकारची संवादाची भूमिका आहे, शेतक-यांनीही दोन पाऊल पुढे यावे, आंदोलन चिघळवणे बरोबर नाही.

पोलिस अधिका-याचे पोलिस महिलेशी संबंध, बायकोने रंगेहाथ पकडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या