28.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home राष्ट्रीय गलवान खो-यातून चीनची माघार

गलवान खो-यातून चीनची माघार

एकमत ऑनलाईन

लडाख : पूर्व लडाखमधील गलवान खो-यात तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत.

चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागात आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे अत्यंत बारीक लक्ष आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तीच ळपान ५ वर स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे. यापूर्वी कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत जे ठरले होते, तो शब्द चीनने फिरवला होता. त्यामुळे १५ जूनच्या रात्री गलवान खो-यात पेट्रोलिंग पॉर्इंट १४ जवळ रक्तरंजित संघर्ष झाला होता. ज्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.

चीनने गलवानमध्येच नव्हे तर हॉटस्प्रिंग, पँगाँग टीएसओ भागातही घुसखोरी केली आहे. इथे फिंगर फोरपर्यंत चिनी सैन्य आहे. हा संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठपर्यंत गस्त घालायचे. त्यामुळे चिनी सैन्याने फिंगर आठपर्यंत माघारी फिरावे ही भारताची मुख्य मागणी आहे. चीनच्या दबावाच्या खेळीसमोर न झुकता भारताने चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य तैनाती केली आहे. गलवानमध्ये चीनच्या कुठल्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारताने टी-९० भीष्म रणगाडेही तयार ठेवले आहेत.

मोदींच्या लेह दौ-यानंतर हालचाली
चिनी सैन्याच्या आगळीकीमुळे मागच्या दीड महिन्यापासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या पूर्व लडाखमध्ये आता तणाव निवळण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह दौ-यानंतर चक्रे वेगाने फिरली. मागच्या ४८ तासांत लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या फे-या झाल्या. पडद्यामागे नेमके काय घडले ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण मोदींच्या लेह भेटीनंतरच दोन्ही देशांचे सैन्य अधिकारी आणि राजनैतिक अधिकाºयांंमध्ये चर्चा झाल्या. त्यातून चीनने माघार घेतल्याची चर्चा आहे.

सैन्य मागे घेण्यामागे अजित डोवाल?
ळराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आणि चीनचे परराष्ट्र मंत्री तसेच स्टेट कौन्सिलर वँग ई यांची व्हीडीओ कॉलवर चर्चा झाली. गलवान खो-यात घडलेल्या घडामोडी आणि भविष्यात काय घडू शकते, हादेखील चर्चेचा भाग होता. या चर्चेमुळेच चीनचे सैन्य बॅकफूटवर गेले अशी चर्चा आहे.

अतिथंडीपासून जवानांच्या बचावासाठी करणार तंबू खरेदी
रक्त गोठवणा-या थंडीपासून बचाव करणारे तंबू भारतीय लष्करासाठी खरेदी केले जाणार आहेत. या तंबूंमुळे जवानांचा अतिथंडीपासून बचाव होण्यास मदत होणार आहे. यासंबंधीची तातडीची आॅर्डर लष्कराने दिली आहे. तसेच ३० हजार अतिरिक्त सैन्य दल लडाखमध्ये पाठवण्यात आले आहे. चीनने काही आगळीक केली किंवा कुरापत केलीच तर त्यासाठीच ही व्यवस्था करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे.

लेहमध्ये उभारले तीन पूल
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारताकडून मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे काम सुरू आहे. या कामावर चीनचा मुख्य आक्षेप होता. काहीही करून भारताने हे काम थांबवावे, यासाठी चीनचा आटापिटा सुरु होता. पँगाँग टीएसओ, हॉटस्प्रिंग आणि गलवान खो-यात घुसखोरी करणा-या चीनला हे काम रोखायचे होते. पण भारताने या दादागिरीला न जुमानता लेहमध्ये रणगाड्याचा भार उचलतील, असे तीन पूल उभारले. त्यामुळे चीनला रोखणे सोपे जाणार आहे.

Read More  लातूर मनपाच्या हद्दीत कोरोना प्रतिबंधासाठी तात्काळ उपाय योजना राबवाव्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या