26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयचिनी सैनिकाचा थंडीने मृत्यू; भारतीय सैनिक ठणठणीत

चिनी सैनिकाचा थंडीने मृत्यू; भारतीय सैनिक ठणठणीत

एकमत ऑनलाईन

बीजिंग : प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणा-या चिनी सैन्याला निसर्गाने तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. पॅन्गाँग सरोवराजवळ घुसखोरी करणा-या चिनी सैन्याच्या जवानाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. या भागात रात्रीच्या वेळेस कडाक्याची थंडी असते. चिनी सैन्य ही थंडी सहन करू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पॅन्गाँग सरोवराजवळ १५ ते १६ हजार फूट उंच असलेल्या टेकड्यांवर जवळपास पाच हजार चिनी सैन्य आहेत. मागील आठवड्यात एका चिनी जवानाला स्ट्रेचरवरून नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्य लडाखमधील थंडीत अधिक काळ राहू शकत नाही, असे चीनने म्हटले होते. चीनच्या सैनिकांना लडाखमधील वातावरण सहन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे चीनच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.

अद्याप हवी तशी थंडी नाही
विशेष म्हणजे या भागात अजूनही थंडी सुरू झाली नाही. तर, दुसरीकडे भारतीय जवानांना कडाक्याच्या थंडीत काम करण्याचा अनुभव आहे.

एनआरसी च्या यादीतून हजारो अपात्र व्यक्तींची नावे हटवणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या