22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeराष्ट्रीयचीनी हेरांची नजर पंतप्रधान कार्यालयावर

चीनी हेरांची नजर पंतप्रधान कार्यालयावर

हेराची चौकशी ; मंत्रालयातील महत्त्वाच्या अधिका-यांची माहिती गोळा करण्याचे षडयंत्र

एकमत ऑनलाईन

बिहार : भारतातील चीनच्या हेरगिरीचा महत्वाचा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाव्यतिरिक्त, दलाई लामा आणि भारतात लावण्यात आलेल्या सुरक्षा उपकरणांवरही चीनी गुप्तहेरांचे लक्ष होते. भारतातील मंत्रालयामध्ये काम करणा-या उच्चाधिकारी आणि नोकरशहांबाबत माहिती गोळा केली जात होती. चीनच्या पकडण्यात आलेल्या हेरांच्या चौकशीत ही माहिती उघड झाली आहे.

चीनने भारतातील हेरांच्या पथकाला पंतप्रधान कार्यालयासह मोठ्या कार्यालयांमधील आतील माहिती गोळा करण्याचे काम दिले होते, अशी माहिती चीनी हेर क्विं शी याच्या चौकशीत उघड झाली आहे. कार्यालयात कोणती व्यक्ती सर्वात महत्वाची आहे, कोण कोणत्या पदावर कार्यरत आहे आणि तो किती प्रभावी आहे, अशी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालू होता.

कोलकात्यातील महिला सहभागी
शीकडून मिळालेल्या माहितीत चीनी हेरांच्या या पथकात महाबोधी मंदिरातील एक प्रमुख बौद्ध भिक्षू आणि कोलकात्यातील एका महिलेचा समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे. क्विं शी आणि या महिलेची भेट घडवून आणली गेली होती. ही महिला शीला महत्वाची कागदपत्रे देत असे. शी ही कागदपत्रे चीनला रवाना करत असे.

पत्रकारासह तिघांचा समावेश
चीनी हेराच्या चौकशीत काही दस्तावेज सापडले आहेत. त्यानुसार, पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी आणि दलाई लामा यांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळवली जात होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या महिन्यात क्विं शी याच्यासह त्याचा नेपाळी साथीदार शेर बहादूर आणि भारतीय पत्रकार राजीव शर्मा यांना अटक केली होती. हे तिघेही तिहारच्या तुरुंगात आहेत.

हेराच्या घराचे भाडे कोण देत होते?
सूत्रांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, भारतात हेरगिरी करण्यासाठी या चीनी गुप्तहेराला चीन दरमहा एक लाख रुपये देत होता. ज्या दक्षिण दिल्ली भागात शी राहात होता, त्या घराचे भाडे दरमहा ५० हजार रुपये होते. हे भाडे कोण भरत होते याचा तपास केला जात आहे.

महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पी. शिवशंकर यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या