23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचोक्सीला भारतात आणणार

चोक्सीला भारतात आणणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. भारताने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी लागणारी कागदपत्रे डोमिनिकाला पाठवली आहेत. देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय विमानही डोमिनिकाला गेले आहे.

दरम्यान त्याच्या वकिलांनी अँटिग्वामधून अपहरण करून मेहुल चोक्सीला जबरदस्ती डोमिनिकामध्ये नेल्याचा दावा केला आहे. भारतातून फरार झाल्यानंतर २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता. सीबीआय आणि ईडीने फक्त केसशी संबंधित फाईल्स डोमिनिकाला पाठवल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय मेहुल चोक्सी प्रकरणासंबंधी डोमिनिका आणि अँटिग्वाशी समन्वय साधत असून सीबीआय आणि ईडी केसशी संबंधित माहिती देण्यात मदत करत आहे.

दरम्यान, भारताचे खासगी विमान डोमिनिकामध्ये २८ मे रोजी दाखल झाल्याच्या वृत्ताला अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दुजोरा दिल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे भारत सरकारने मेहुल चोक्सी फरार असल्याचे सिद्ध करण्यासाठी तेथील कोर्टामधील कागदपत्रे पाठवली असून ही कागदपत्रे येथील पुढील सुनावणीत वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी अँटिग्वा न्यूज रुमशी बोलताना दिली आहे.

केंद्र सरकार प्रयत्नशील
मेहुल चोक्सीचे भारतात प्रत्यार्पण व्हावे, यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चोक्सीने अँटिग्वामधून पळ काढून प्रत्यार्पण प्रक्रिया सोपी केली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. भारतीय तपास यंत्रणांनी अपहरण केल्याचा त्याचा दावा निराधार आहे. डोमिनिकाने बेकायदेशीर देशात प्रवेश केल्यामुळे कारवाई केल्याचे एका अधिका-याने सांगितले.

भारताच्या ताब्यात द्या : ब्राऊन
गॅस्टर ब्राऊन यांनी जर मेहुल चोक्सीला पुन्हा अँटिग्वाला पाठवले तर त्याला पुन्हा एकदा नागरिकत्वाचे कायदेशीर आणि घटनात्मक अधिकार मिळतील. त्यामुळे चोक्सीचे अँटिग्वाऐवजी थेट भारतात प्रत्यार्पण करावे, अशी आमची विनंती आहे, असे म्हटले.

उदगीर शहरात जनता कर्फ्यू कडकडीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या