26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयगोव्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करणा-या ख्रिस्ती धर्मगुरुंना अटक

गोव्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करणा-या ख्रिस्ती धर्मगुरुंना अटक

एकमत ऑनलाईन

पणजी : राज्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करणा-या ख्रिस्ती धर्मगुरुंना गोवा पोलिसांनी अटक केली. डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास अशी अटक झालेल्या धर्मगुरुंची नावे आहेत. बेकायदा धर्मांतराच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी सडये शिवोली इथल्या फोर्थ पीलर चर्चच्या डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास यांना अटक करण्यात आली. धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याच्या कारणाखाली गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

म्हापसा पोलिसांनी गुरुवारी (२६ मे) रात्री साडेआठच्या सुमारास कारवाई करत शिवली इथून डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्यावर कलम १५३ अ, (धर्मावर आक्षेपार्ह किंवा हल्ले करणे) , २९५ अ (धार्मिक भावना भडकावणे) तसेच औषधे आणि उपाय कायदा १९५४ च्या कलम ३ आणि ४ (आक्षेपार्ह जाहिराती) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश खोबरेकर नावाच्या व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, डिसोझा आणि मस्कारेन्हास यांनी एका अज्ञात व्यक्तीला धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले होते. याशिवाय आरोपींनी जाणूनबुजून शब्द, कृतीतून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने धमकावले आणि त्यांनी सांगितलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गोव्यात मागील अनेक वर्षांपासून डॉमनिक आणि जॉन बेकायदेशीररित्या धर्मपरिवर्तन करत असत. पैसे, औषधे आणि चांगले खाणे-पिणे याचे आमिष दाखवून गरीब नागरिकांना धर्म बदलण्यास सांगत असत. आरोपींविरोधात याआधी अशाप्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याआधीच धर्मपरिवर्तन यावर बंदीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या