31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयपश्चिम बंगालमध्ये 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू होणार; प्रेक्षकांची संख्या 50 टक्केच असणार

पश्चिम बंगालमध्ये 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू होणार; प्रेक्षकांची संख्या 50 टक्केच असणार

एकमत ऑनलाईन

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात सर्व सिनेमागृहे, नृत्य, गायनाचे कार्यक्रम आणि जादूचे प्रयोग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून पश्चिम बंगालमध्ये सिनेमागृहे सुरू होणार आहेत. मात्र, ही परवानगी देताना कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी प्रेक्षकांची संख्या 50 टक्केच असणार आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. जनजीवन सामान्य होण्यासाठी जत्रा, नाटक, जादूचे प्रयोग, सिनेमागृहे, , संगीत, नृत्य-गायनाचे कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ही परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे तसेच कोरोनापासून बचावाच्या अटींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सिनेमागृह, नृत्य, गायनाचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलाकरांचे नुकसान होत आहे. पश्चिम बंगालमधून सिनेमागृहे सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कलाकारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयाने या उद्योगाला उभारी मिळणार असल्याचे कलाकारांनी सांगितले.

सर्पदंश झालेल्या कर्मचाऱ्याचा मुख्याधिकाऱ्यांनी उचलला खर्च; दैनिक एकमतच्या बातमीचा दणका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या