भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि आमदार आरिफ मसूद, पीसी शर्मा यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भोपाळमधील जिल्हा पंचायत कार्यालयाबाहेर पोलिसांशी झटापट झाली.
पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना पंचायत कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते.
यावेळी दिग्विजय सिंह पोलिस कर्मचा-याच्या शर्टाची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दिग्विजय सिंह यांनी हिंसकपणे पोलिस कर्मचा-याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. दरम्यान पोलिस आणि प्रशासन सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
भाजप नेते आणि राज्यमंत्री भूपेंद्र सिंह जिल्हा पंचायत कार्यालयात पोहोचताच आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे वाहन रोखले. दिग्विजय सिंह आणि आरिफ मसूद सिंह यांनी गाडीसमोर उभे राहात पंचायत कार्यालयात मंत्र्यांची गाडी रोखली.