नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला.
सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केले आणि त्याविरोधातील याचिकेत योग्यता नसल्याचे म्हटले. २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी एसआयटीने पंतप्रधान मोदींसह इतर अनेकांना क्लीनचिट दिली, त्याविरोधात झाकिया जाफरी यांनी याचिका दाखल केली होती.