डोडा : अमरनाथनंतर आज सकाळी जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील ठाठरीमध्ये ढगफुटीची घटना समोर आली आहे. ठाठरी येथील लष्करी छावणीजवळ पूर आला आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
डोंगरावरून आलेल्या पाण्यासोबत अनेक घरे ढिगा-याखाली दबल्याचेही वृत्त आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर साचलेल्या ढिगा-यात अनेक वाहने अडकली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.