24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयलडाख सीमेवर युद्धाचे ढग?

लडाख सीमेवर युद्धाचे ढग?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळातही कुरापात काढण्याची चीनची खुमखुमी कमी झालेली नाही. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरून भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनने पुन्हा पूर्व लडाखच्या सीमा रेषेवर मोठया प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. हजारोंच्या संख्येने चिनी सैनिक भारत सीमेवर जमले असल्याची वार्ता कळताच भारतानेही सावध पवित्रा घेतला आहे. चीनच्या या हालचालीची गांभीर्याने दखल घेत भारताने ही ५० हजार सैनिकांना या भागात तैनात केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून, सीमेवर युद्धाचे ढग गोळा होऊ लागले आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी गलवान खो-यात झालेल्या हिंसाचारानंतर चीनने तिथे जितके सैनिक तैनात केले होते, त्यापेक्षा १५ हजार अधिक सैनिक आता तिथे पाठवले आहेत. गेल्या काही महिन्यांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारताशी चर्चेच्या फे-या सुरू असतानाही या भागात ५० हजारांपेक्षा अधिक सैनिक तैनात केले आहेत. चीनच्या या हालचाली भारतासाठी चिंताजनक आहेत. हा सीमा प्रश्न सोडवण्याच्याबाबतीत चीनच्या हेतू विषयीही यामुळे शंका निर्माण होत आहे. अर्थात, चीनच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी भारतही सज्ज असून, सीमा रेषेसह लडाखमध्येही भारताने अतिरिक्त स्ट्राइक कॉर्प्स तैनात केले आहेत. मथुराच्या वन स्ट्राईक कॉर्प्सला लडाखमधील उत्तर सीमेवर पाठविण्यात आले असून, १७ माउंटन स्ट्राइक कॉर्प्सला अतिरिक्त दहा हजार सैनिकांची कुमक पाठवण्यात आली आहे.

वायुसेनेसह सर्व दल सुसज्ज
संपूर्ण उत्तर-पूर्व राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भारतीय वायुसेनाही सज्ज झाली असून, राफेलसह मिग -२९, सुखोई- ३० विमानांची तुकडी उत्तर सीमा भागात तैनात करण्यात आली आहे.

भारताचे शस्त्रास्त्रे
टी -९० भीष्म, पिनाका रॉकेट, अपाचे, चिनूक आदी लढाऊ विमानेही सीमेवर सज्ज ठेवण्यात आली आहेत. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर प्रथमच के-९ तोफाही तैनात केल्या असून, एम -७७७ तोफखाना सज्ज झाला आहे.

राजकीय आणि सैन्य पातळीवर चर्चा सुरू
भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला सीमा रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही देश राजकीय आणि सैन्य पातळीवर चर्चा करीत आहेत. २५ जून रोजी या चर्चेची आणखी एक फेरी पार पडली आणि यावेळी त्यांनी पूर्व लडाखमधील संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शक्य तितक्या लवकर सैन्याच्या चर्चेच्या पुढील फे-या घेण्याचा निर्णय घेतला होता.

कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी-भारत बायोटेक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या