22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी अटकेत

मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी अटकेत

एकमत ऑनलाईन

गोरखपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. लेडी डॉन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून ४ फेब्रुवारी रोजी ट्विट करण्यात आले होते. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्यानंतर गोरखपूरच्या ठाणे कॅन्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात असे आढळून आले की ज्याने ट्विट करून धमकी दिली होती तो फिरोजाबादचा राहणारा सोनू नावाचा गुन्हेगार आहे. तसेच आग्रा तुरुंगात बंद आहे. या ट्विटमध्ये हापूर पोलिसांना टॅग करण्यात आले होते. लेडी डॉन नावाच्या ट्विटर अकाउंटवरून मेरठ आणि लखनौमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.

ट्विटनंतर सर्वेलन्स टीम या प्रकरणाचा तपास करीत होती. निवडणुकीदरम्यान केलेल्या या ट्विटमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे प्यादे आहेत, खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत, असे लिहिले होते. भाजप नेत्यांच्या वाहनांवर आरडीएक्स हल्ला करणार आहे. लखनौ रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर बॉम्ब पेरण्याची आणि मेरठमध्ये दहा बॉम्बस्फोट करणार असल्याचेही म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या