24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयजगभरातील ५० देशांना हवेत को-विन अ‍ॅपचे तंत्रज्ञान

जगभरातील ५० देशांना हवेत को-विन अ‍ॅपचे तंत्रज्ञान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने कोरोनाविरोधी लसीकरणामध्ये यूके आणि अमेरिकेलाही पिछाडीवर टाकत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. त्याचवेळी भारतात लसीकरणाची मोहीम यशस्वीरीत्या राबवणा-या को-विन अ‍ॅपचीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. को-विन पॅनेलचे चेअरमन असलेले आर एस शर्मा यांनी को-विन अ‍ॅपशी संबंधित एक मोठी माहिती जाहीर केली आहे. को-विनला ५० देशांमध्ये प्रसिद्धी मिळाल्याची माहिती त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
त्यासोबतच कोविन तंत्रज्ञानाच्या बाबतीतही मोठी घोषणा त्यांनी केली आहे. अनेक देश को-विनचे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळेच को-विनला मिळणा-या लोकप्रियतेच्या निमित्ताने मोठी घोषणा आऱ एस़ शर्मा यांनी केली आहे.

जगभरात को-विनला पसंती मिळत असून ५० देशांनी या तंत्रज्ञानाला पसंती दाखवल्याचे ट्विट आऱ एस़ शर्मा यांनी केले आहे. सेंट्रल आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका या देशांनी भारतातील को-विन अ‍ॅपच्या तंत्रज्ञानासाठी रस दाखवला आहे. या प्रतिसादामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने या अ‍ॅपचे ओपन सोर्स व्हर्जन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे अ‍ॅप मोफत अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. डिजिटल इंडिया पुढाकाराअंतर्गतच हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या देशांने कोविनचे तंत्रज्ञान हवे आहे, अशा देशांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल असेही आऱ एस़ शर्मा यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गतच जगभरातील देशांना भारताकडून हे तंत्रज्ञान पुरविण्यासाठीचा पुढाकार घेण्यात आला आहे.

को-विनचा भारतातील वापर
देशात ३२ कोटी लोकांनी कोरोनाविरोधी डोस घेतले आहेत. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २६ कोटी ६३ लाख तर दुसरा डोस हा ५ कोटी ६० लाख जणांनी घेतला. त्यामध्ये पुरूषांची संख्या १७ कोटी ३६ लाख तर महिलांची संख्या १४ कोटी ८७ लाख इतकी आहे.

को-विन एपवर ३४ कोटी ५१ जणांची नोंदणी
देशात सर्वाधिक डोस उत्तर प्रदेश या राज्यात देण्यात आले. त्यापाठोपाठ सर्वाधिक डोस हे महाराष्ट्रात देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये मोठया प्रमाणात लसीकरण झाले आहे. देशात को-विन एपवर ३४ कोटी ५१ लाख इतक्या मोठया प्रमाणात नागरिकांनी नोंदणी केली आहे.

अनेक पार्टनरची को-विनला मदत
देशात एकुण ४८ हजाराहून अधिक ठिकाणी लसीकरण केंद्रातून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ४६ हजार शासकीय केंद्रे आहेत, तर खासगी केंद्रांची संख्या १९५८ इतक्या मोठया प्रमाणात लसीकरण केंद्राची संख्या आहे. फेसबुकला आरोग्य सेतू, डिजीलॉकर, उमंग, सीएससी, यूएनडीपी यासारखे पार्टनर को-विन अ‍ॅपला पार्टनर म्हणून मदत करतात.

काय आहेत कोविन एपचे फीचर्स
– पिनकोडवर सर्च करण्याची सुविधा
– जिल्हावार सर्च करण्याची सुविधा
– मॅपवर सर्च करण्याची सुविधा
– नोंदणीचा पर्याय
– स्लॉट कम्फर्मेशनची सुविधा
– स्लॉट बुंिकगची सुविधा
– अपॉईंटमेंट बुकिंगची माहिती

सीमेवर भारताचे ५० हजार सैनिक तैनात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या