कोलकाता : पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध बेकायदेशीर कोळसा घोटाळा प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी अनुप मांझीच्या दोन साथीदारांची सुमारे २५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या दोन साथीदारांची नावे जयदेव मंडल आणि गुरुपाद मांझी अशी आहेत. ईडीच्या वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत सीबीआयने २७ नोव्हेंबर २०२१ रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे या लोकांविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यानुसार तपास सुरू झाला होता.