श्रीनगर : काश्मीर खो-यात सातत्याने वाढत चाललेल्या काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंगमुळे दहशतीत असलेले पंडित आता खोरे सोडून निघून जात आहेत.
पंतप्रधानांच्या मदतीतून उभी राहिलेली अनंतनाग येथील मट्टनमधील काश्मिरी पंडितांच्या कॉलनीत भीषण शांतता पसरलेली आहे. इथे राहणा-या एका काश्मिरी पंडितांने दिलेल्या माहितीनुसार मट्टन कॉलनीतील ९० टक्के काश्मिरी पंडितांनी त्यांची घरे सोडली आहेत. लोकांच्या संयमाचा बांध आता तुटला आहे. त्यामुळे रात्रीतून घरे सोडत काश्मिरी पंड़तिांनी पलायन केले आहे. ही कॉलनी पंतप्रधानांच्या पॅकेजच्या योजनेंतर्गत तयार करण्यात आली होती.
इथे काश्मिरी पंडित समुदायातील सरकारी कर्मचारी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून खो-यात सुरु असलेल्या हत्यांच्या सत्रामुळे अनेकांनी कॉलनीतील घरे सोडून, इतर गावी प्रस्थान केले आहे. परिस्थिती सुधारली तरच ते परततील अशी आशा आहे.
खोरे सोडून जाण्यासाठी प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी
दुसरीकडे अनंनाग आणि कुलगाममधील काही परिसरातील काश्मिरी पंडितांनी स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. खोरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काश्मिरी पंडित असलेल्या राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरुच आहे. जोपर्यंत सुरक्षेची योग्य उपाययोजना होत नाही तोपर्यंत पडितांनी या ठिकाणाहून हलवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याचा सरकारचा निर्णय
टार्गेट किलिंगची वाढती व्याप्ती आणि धोका लक्षात घेता, काश्मीरात येत असलेल्या प्रवाशांना आणि जम्मू परिसरातील इतर क्रमचा-यांना ६ जूनपर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल, असा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने घेतला आहे. सगळअयांना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जम्मूत मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचा-यांचे म्हणणे आहे की, टार्गेट करुन कर्मचा-यांची हत्या करण्यात येते आहे.