23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeराष्ट्रीयभारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून रंगीत तालीम

भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून रंगीत तालीम

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोना लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची रंगीत तालीम सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पुण्यातील मांजरी येथे कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी भारत बायोटेक या कंपनीचे काम अंतिम टप्यात आले असून, प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे. सध्या देशात अपेक्षित प्रमाणात कोरोना लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने नवीन निर्मितीकडे लक्ष लागले आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून कंपनीच्या व्यवस्थापनाबाबत लागणारÞ्या विविध विभागांच्या परवानग्या कंपनीला देण्यात आल्या आहेत. कागदोपत्री परवानग्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच लस निर्मितीसाठी लागणारे वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.

सर्व परवानग्या परिपूर्ण
देशमुख यांनी सांगितले, कंपनी व्यवस्थापनाबाबत प्रशासकीय पातळीवरील अन्न व औषध प्रशासन (एफडीए), महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ (एमएसीबी), प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि इतर विभागांकडून ना-हरकत परवानग्या देण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीला यंत्रसामग्रीचे व्यवस्थापन जाणून घेत तांत्रिक दुरुस्त्यांची कामे सुरू आहेत. कंपनीच्या हैदराबाद येथील मुख्यालयातून तज्ज्ञांचे पथक पाहणीसाठी आले होते. त्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर करण्यात येत आहेत.

शासन नेहमीच शेतक-यांसोबत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या