24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeराष्ट्रीयसलग पाचव्या दिवशी ८९ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त

सलग पाचव्या दिवशी ८९ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाचे देशात रोज नवे आकडे समोर येत आहेत. गेल्या २४ तासांत ८३ हजार ५२७ कोरोना संक्रमित रुग्ण समोर आले. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे याच काळात जवळपास ८९ हजार ७४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सलग पाचव्या दिवशी कोरोना संक्रमणातून मुक्त होणा-या रुग्णांची संख्या नव्या कोरोना संक्रमितांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत ४५ लाख ८७ हजार ६१४ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट ८१.२५ टक्क्यांवर गेला आहे.

रुग्णसंख्या ५६ लाखांवर
जगभरात थैमान घालणा-या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. आजही ८३ हजारांवर रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहोचली आहे. देशभरातील एकूण कोरोनाबाधितांमध्ये ९ लाख ६८ हजार ३७७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ४५ लाख ८७ हजार ६१४ जणांनी कोरोनावर मात केली. तसेच आतापर्यंत ९० हजार २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात पुन्हा विक्रमी रुग्णवाढ
राज्यात आज दिवसभरात २१ हजार २९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यासोबत राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के इतके झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ६१ लाख ६ हजार ७८७ नमुन्यांपैकी १२ लाख ६३ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज ४७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे, असेही ते म्हणाले.

दिल्लीत विरोधकांचा मोर्चा; कृषी बिलाविरोधात आक्रमक, आंदोलनाने संसद परिसर दणाणला

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या