नवी दिल्ली : आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा दर वाढला आहे. हा सिलिंडर आता ५५ रुपयांना महाग होईल. चेन्नईमध्ये १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर ५६ रुपयांनी महागला आहे. चेन्नईमध्ये त्याची किंमत आता प्रति सिलिंडर १४१० रुपयांवर गेली आहे. दिल्लीतील १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ५५ रुपयांनी वाढ झाली असून आता ती १२९६ रुपये करण्यात आली आहे.
त्याशिवाय कोलकाता आणि मुंबईत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ५५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल सिंिलडरची नवीन किंमत कोलकाता येथे १३५१.५० रुपये आणि मुंबईत १२४४ रुपये आहे. तथापि, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये आढावा घेताना किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याची भीती जरी व्यक्त केली जात असली तरी एलपीजीही महाग झालेला नाही.
कोविशिल्ड लस सुरक्षित असल्याचा सिरमकडून पुनरुच्चार