नवी दिल्ली : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या(१९ किलो)किमती आज कमी झाल्यामुळे एलपीजी सिलिंडर वापरणा-या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने(आयओसी) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे.
यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ३६ रुपयांनी स्वस्त झाली आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ३६ रुपयांनी कपात केल्यानंतर आता १९३६.५० रुपये प्रति सिलिंडर झाला आहे जो पूर्वी १९७२.५० रुपये प्रति सिलिंडर होता.