22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबई मॉडेलची नीती आयोगाकडूनही दखल

मुंबई मॉडेलची नीती आयोगाकडूनही दखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुस-या लाटेचा कहर कायम आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मात्र कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. कोरोना नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलची काही दिवसांपुर्वी सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रशंसा केली होती. आता देशाची आर्थिक धोरणे ठरवणा-या नीती आयोगानेही प्रशंसा केली आहे. मुंबई मॉडेल प्रेरणादायक असल्याची शाबासकी नीती आयोगाने मुंबई महापालिकेला दिली आहे.

कोरोनाच्या उद्रेकामुळे देशात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या घटताना पाहायला मिळत आहे. दुस-या लाटेचा प्रकोप वाढल्यानंतर मुंबईतील परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. आता नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीही महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि टीमचे कौतुक केले आहे.

सरकारीसह खासगी रुग्णालयांतील बेडचेही वाटप
केंद्रीय पद्धतीने बेडचे वाटप, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड बनवणे, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुराव्यासाठी वॉर रुम निर्माण करणे, या बाबी कौतुकास्पद व प्रेरणादाई असल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. ट्विटरवरुन त्यांनी मुंबई महापालिकेला शाबासकी दिली आहे. दरम्यान मुंबईतील नवीन रुग्णसंख्येत दररोज घट होत आहे. रविवारी २,४०३ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरण नोंदणीच्या कोविन अ‍ॅपमध्ये मोठा बदल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या