22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयआरोग्य विम्यांच्या दाव्यांमुळे कंपन्या हैरान

आरोग्य विम्यांच्या दाव्यांमुळे कंपन्या हैरान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्याने विमा कंपन्यांनी इष्टापत्ती समजून नव्या विशेष कोविड मेडिक्लेम पॉलिसी सादर करण्याचा सपाटा लावला. मात्र, वर्षभरातच कंपन्यांचा उत्साह मावळला असून, मिळालेल्या एकूण प्रीमियमच्या रकमेच्या १५० टक्के अधिक रक्कम त्यांना दाव्यांपोटी द्यावी लागली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नवी पॉलिसी घेतलेल्या केवळ २५ टक्केच ग्राहकांनी मेडिक्लेमचे दावे करूनही कंपन्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी कोविड पॉलिसीतून काढता पाय घेण्याचे धोरण अवलंबले आहे.

कंपन्यांच्या या भूमिकेमुळे नवीन पॉलिसी घेण्याची इच्छा असलेल्यांना आणि जुन्या पॉलिसीचे नूतनीकरण करणाºयांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे. सध्या बाजारातील बहुतांश कंपन्यांनी कोविड पॉलिसींना टाळे ठोकले आहे. याशिवाय कंपन्यांनी सर्वसाधारण मेडिक्लेम पॉलिसीच्या प्रीमियममध्येही वाढ केली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढले, त्या वेळी कंपन्यांनी कोरोनारुग्णांवर होणाºया उपचार खर्चांसाठी कोरोना कवच मेडिक्लेम पॉलिसीची सुरुवात केली होती. त्या अंतर्गत दरमहा ५०० ते ५००० रुपयांचा प्रीमियम भरून संरक्षण देण्यात येत होते. या पॉलिसींचा कालावधी साडेतीन ते नऊ महिन्यांचा आहे. त्या अंतर्गत ५० हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पॉलिसींचे नूतनीकरण बंद
कोरोना कवच पॉलिसींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागेल, हे कंपन्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. त्यामुळे आता त्यांनी या पॉलिसींचे नूतनीकरण बंद केले आहे. याशिवाय बºयाच विमा कंपन्यांनी विशेष कोविड मेडिक्लेम पॉलिसीही बंद केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनासाठी आता कोणतीही विशेष मेडिक्लेम पॉलिसी उपलब्ध नाही.

आसाममध्ये नेतृत्व बदलाची तयारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या