30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home राष्ट्रीय कंपनीची जिओसोबत बोलणी : पबजी ऍपवरील बंदी हटवणार असल्याची शक्यता

कंपनीची जिओसोबत बोलणी : पबजी ऍपवरील बंदी हटवणार असल्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी पबजीसह 1013 ऍप्सवर बंदी घातली आहे. परंतू पबजी खेळणाऱ्यांची संख्या कोट्यावधींच्या घरात असल्यामुळे मोदी सरकार पबजी ऍपवरील बंदी हटवणार असल्याची शक्यता आहे.

पबजी हे दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडिओच उत्पादन आहे. परंतू या गेमची फ्रेंचायजी चिनी कंपनी टेन्सेंन्टकडे होती. मात्र ब्ल्यू होल स्टुडियोने टेन्सेंन्टकडे असलेली फ्रेंचायजी काढून घेतली आहे. आता हा गेम पूर्णपणे दक्षिण कोरियाचा झाला आहे. त्यामुळे पबजीवरील बॅन हटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसेच ब्ल्यू होल स्टुडियोच्या ब्लॉगपोस्टमधून कंपनीची जिओसोबत बोलणी सुरु असल्याचे समोर आले आहे. ब्ल्यू होल स्टुडियो जिओ कंपनीला डिस्ट्रिबुशनच काम देऊ शकती. या कराराबाबत सध्यातरी प्राथमिक स्तरावर बोलणी चालु आहे. त्यामुळे अधिकृत निर्णय यायला वेळ लागू शकतो.

दरम्यान, मोदी सरकारने पबजीसह 118 ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घोण्याआधी कसरकनरने 59 चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्या ऍप्समध्ये लोकप्रिय ऍप्सचाही समावेश होता.

पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचे आसुड आंदोलन.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या