26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयगुंतागुंतीचे प्रकरण ३ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग

गुंतागुंतीचे प्रकरण ३ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : निवडणूक काळात मोफत वाटपाचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आहे. मोफत वाटप किंवा मोफत योजनांबाबत मागील काही दिवसांपासून देशभरात गदारोळ चालू आहे. केंद्र सरकारने राज्याला मोफत सुविधांवर लगाम घालण्याचे आवाहन केल्यानंतर दक्षिणेतील काही पक्षांकडून आणि दिल्लीतील आपकडून या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून आता हे प्रकरण तीन सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे, की फ्रीबीज प्रकरणाची गुंतागुंत पाहता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले जाते. सुप्रीम कर्टाने आपल्या निकालात सांगितले की, मोफत वाटप सुरू राहिले तर भविष्यात देश आर्थिक आपत्तीकडे जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण तीन सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले जात आहे. दरम्यान या प्रकरणाची सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना, न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमर्ू्ती हिमा कोहली यांच्या अध्यतेखाली सुनावणी पार पडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या