23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीय१० राज्यांत वाढली चिंता

१० राज्यांत वाढली चिंता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मागच्या ४ दिवसांत कोरोनावर उपचार करणा-यांची संख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोनाचा आढावा घेतला. त्यात १० राज्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूरचा समावेश असून, येथे कोरोनाबाबत कडक उपाययोजना करणाच्या सूचना केल्या.

देशातील ४६ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे, तर ५३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे अधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा, असा आदेशही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. मागच्या काही आठवड्यात ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे, अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर स्थिती आणखी बिकट होईल, असे सांगण्यात आले आहे. १० राज्यांतील ८० टक्के कोरोनाचे रुग्ण हे होम आयसोलेशनमधून समोर येत आहेत. त्यामुळे राज्यांनी वाड्या-वस्त्या, कॉलनीतील लोकांना एकमेकांना भेटण्यास मज्जाव करावा. रुग्णालयातील रुग्णांवर योग्य उपचार मिळावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर होम आयसोलेनमधील रुग्णांची योग्य देखभाल करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांवर असलेल्या जिल्ह्यांत कडक निर्बंध
कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यावर राज्य सरकार जोर देत आहे. या जिल्ह्यातील लसीकरण वेगाने केले जात आहे. तसेच या भागातील सीरो सर्व्हे करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. केरळमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय टीम पाठवली आहे.

भटक्या, निराधारांचे लसीकरण करा
देशातील १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, भटके आणि निराधार व्यक्तींना लस घेण्यास अडचणी येत आहेत. आवश्यक साधने नसल्याने रजिस्टर करू शकत नाहीत. यासाठी केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून भटक्या, निराधार व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर यासाठी आराखडा आखण्यास सांगितला आहे.

चीन, जपानमध्ये पुन्हा संकट, मलेशिया, अमेरिकेत रुग्णवाढ
कोरोनावर मात करण्यात चीन यशस्वी ठरल्याचे सांगितले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांत चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राजधानी बीजिंगसहित १५ शहरांत कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. तसेच अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटने डोके वर काढले असून, गेल्या २४ तासांत १ लाख नवे रुग्ण सापडले. याशिवाय जपान, थायलंड, मलेशियातही कोरोना रुग्ण वाढले असून, या तिन्ही देशांत विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत.

भारतीय हॉकी महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या