महाराष्ट्रात तूर्तास ‘पुनश्च हरिओम’ नाहीच;- ५० टक्के शिक्षक आणि कर्मचा-यांना परवानगी
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अंमलात आणलेल्या ताळेबंदीला आता हळूहळू सैल करण्यात येत असून, अनलॉकच्या चौथ्या टप्प्यांतर्गत नियम व अटींना बांधील राहून देशातील ठराविक राज्यातील शाळा सोमवार दि. २१ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शाळा नेमक्या कधी सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सहा महिन्यांहून अधिक काळासाठी बंद असलेल्या शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय काही राज्यांनी घेतला आहे. कोरोना संक्रमणाच्या आकड्यांत दिवसेंदिवस वाढ होत असलेली असतानाच अनलॉकच्या प्रयत्नात खबरदारी घेऊन अनेक राज्यांकडून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, अनेक राज्यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २१ सप्टेंबरपासून काही ठराविक राज्यांत इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा आणि महाविद्यालय सुरू केले जाणार आहेत.
प्रारंभ निम्म्या शिक्षक, कर्मचा-यांनाच परवानगी
सुरूवातीला केवळ ५० टक्के शिक्षक आणि कर्मचारीवर्गासहीत शाळा उघडण्यात येणार आहेत. पालकांकडून लिखित परवानगी घेतल्यानंतरच शाळेत मुले दाखल होऊ शकणार आहेत. यासाठी शाळांना मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग प्रवेशव्दारावरच
कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर अशा उपायांचा अनिवार्य वापर करावा लागणार आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंगही केली जाणार आहे. खुल्या जागेत वर्ग भरणार नाहीत, सोबतच मुलांची बसण्याच्या व्यवस्थेत एकमेकांपासून कमीत कमी ६ फुटांचे अंतर असणे गरजेचे आहे.
शाळा बंद असलेली राज्ये
उत्तर प्रदेश , दिल्ली , गुजरात , मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड , छत्तीसगड, राजस्थान, केरळ आणि कर्नाटक.
शाळा सुरू होणार असलेली राज्ये
हरियाणा, आसाम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, चंदीगड, नागालँड, मेघालय आणि आंध्र प्रदेश.
कन्टेन्मेंट झोन वगळून शाळा उघडण्याची परवानगी
कन्टेन्मेंट झोन वगळून इतर भागांतील शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली असून, या शाळांमध्येही कन्टेन्मेंट झोन भागात राहणा-या शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही.
- शाळा परिसरातील नियम
- – एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर पाळणे गरजेचे
- – फेस कव्हर किंवा मास्कचा वापर अनिवार्य
- – हात कमीत कमी ४०-६० सेकंद धुणे गरजेचे
- – अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरचा वापर गरजेचा
- – खोकताना, शिंकताना नाका-तोंडाला रुमाल गरजेचा
- – आजारी वाटल्यास लगेचच संबंधित अधिका-यांना सूचित करा
- – शाळा परिसरात थुंकण्यार बंदी
- – शक्य असेल तिथे आरोग्य सेतू अॅपचा वापर करावा
माळशिरस भागात अतिवृष्टी १६ गावांतील २ हजार ५०० लोक बाधित