25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयदीप सिद्धूला सशर्त जामीन

दीप सिद्धूला सशर्त जामीन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीत लाल किल्ल्यावर २६ जानेवारी रोजी धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. दीप सिद्धूला तीस-तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जामीन देताना काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.

त्याला त्याचा पासपोर्ट तपास अधिकाºयांकडे जमा करण्यास सांगितला आहे. त्याचबरोबर तो वापरणार असलेल्या फोन नंबरची नोंद तपास अधिकाºयाकडे करण्यास सांगितली आहे. या फोनचे लोकेशन २४ तास आॅन ठेवण्याबरोबर फोन स्विच आॅफ करण्यास मनाई केली आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि १५ तारखेला आपले लोकेशन सांगण्याची अट ठेवली आहे.

८ एप्रिलला झालेल्या सुनावणीत आरोपी दीप सिध्दूने स्वत: निर्दोष असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला होता. तसेच जामीन देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात मला फसवले जात असल्याचा आरोप केला होता. तर सरकारी पक्षाने जामीन अर्जाला विरोध करत दीप सिद्धू मुख्य आरोपी असल्याचे सांगितले होते़

आरोग्य विभागाकडुन कोविड लसीकरणासाठी धडपड; ग्रामिण भागातिल नागरिकाकडुन समीश्र प्रतीसाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या