बेंगळूरू : शाळेतील मुलांच्या बॅगची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आठवी नववी मुलांच्या बॅगेत कंडोम, सिगारेट,गर्भनिरोधक गोळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूमधील अनेक शाळांमध्ये अशा तक्रारी येत होत्या की, तेथील विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या बॅगमध्ये मोबाईल लपवून वर्गात आणत आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये मुलांच्या दप्तरांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. इयत्ता ८वी, ९वी आणि १० वीच्या मुलांच्या शाळेच्या बॅगची झडती घेतली असता त्यात मोबाईल सापडले. मोबाईलसोबत धक्कादायक गोष्टीही सापडल्या. विद्यार्थ्यांच्या बॅगेत चक्क कंडोम, दारू, सिगारेट, गर्भनिरोधक गोळ्या आढळल्या. त्यासोबतच लायटर, काही रोख रक्कम सुद्धा आढळून आली.
बॅगमध्ये वेगवेगळया आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यावर शाळा व्यवस्थापनाने पालक आणि शिक्षकांच्या मींिटगचं आयोजन केलं. ज्यावेळी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या पालकांना या आक्षेपार्ह वस्तू बॅगेत आढळल्याचे सांगितले तेव्हा त्या पालकांनाही धक्का बसला. मुलांच्या बॅगेत अशा प्रकारे आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्याने ही परिस्थिती व्यवस्थित हाताळणं खूपच गरजेचं होतं. अशा परिस्थितीत मुलांना सस्पेंड करण्याच्या ऐवजी त्यांचं काऊंसंिलग करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली.