24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयझारखंडमध्ये सोमवारी विश्वासदर्शक ठराव

झारखंडमध्ये सोमवारी विश्वासदर्शक ठराव

एकमत ऑनलाईन

रांची : महाराष्ट्र राज्यानंतर झारखंडमध्ये सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरु केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आपल्या आमदारांना दुसरीकडे शिफ्ट करावे लागले आहे. झारखंडच्या राजकारणातील सस्पेन्स कायम असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारने येत्या सोमवारी विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. त्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.

महागठबंधन आमदारांचे संख्याबळ पाहता सोरेन सरकार हा ठराव जिंकेल. त्यामुळे बिहार, दिल्लीपाठोपाठ झारखंडमध्येही ‘ऑपरेशन लोटस’ फेल होणार हे निश्चित मानले जात आहे. झारखंडमध्ये कथित खाण वाटप लिलावात घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप आहे. मुख्यमंत्री सोरेन यांनी लिलावात स्वत:च एक खाण घेतली. हा ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचा भाजपचा आरोप आहे.

सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस
या आरोपावर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे गेल्या आठवड्यात केली. मात्र, राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. या काळात भाजपकडून झामुमो, काँग्रेस आणि राजदचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. तर, मुख्यमंत्री सोरेन यांनी झामुमो, काँग्रेस आणि राजद आमदारांना छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हलविले आहे. तीन दिवसांपासून हे आमदार रायपूरच्या रिसॉर्टमध्ये आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सोरेन यांनी काल मंत्रीमंडळ बैठक घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याप्रमाणंच विशेष अधिवेशन बोलवून स्वत:च विश्वासदर्शक ठराव मांडायचा निर्णय सोरेन यांनी घेतल्याचे वृृत्त आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या