31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयकोरोना लसबद्दल तिस-या टप्प्यातील कार्यक्षमता चाचणीनंतरच खात्री शक्य

कोरोना लसबद्दल तिस-या टप्प्यातील कार्यक्षमता चाचणीनंतरच खात्री शक्य

एकमत ऑनलाईन

कोरोना लसबद्दल डॉ. गगनदीप कांग यांचे मत

नवी दिल्ली : देशभरात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता कोरोनावर परिणामकारक ठरणा-या लसीची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र, याबद्दल भारतातील आघाडीच्या वैद्यकीय शास्त्रांज्ञांपैकी एक व कोविड औषधी आणि लसीसाठी तयार करण्यात आलेल्या आयसीएमआर पॅनलच्या अध्यक्षा डॉ. गगनदीप कांग यांनी लस विकसित करण्याच्या मार्गातील आव्हानांबाबत देशभरातील नागरिकांना झूमद्वारे माहिती दिली. मुळातच लसीच्या कार्यक्षमतेबद्दल माहिती नसेल, तर ती मानवावर परिणामकारक ठरेल किंवा नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे तिस-या टप्प्यातील कार्यक्षमता चाचणीची गरज आहे.

२०२१ च्या सुरुवातीस लस येण्याच्या शक्यतेबाबत डॉ. गगनदीप कांग म्हणाल्या की, मला वाटतं याची शक्यता आहे. परंतु ठामपणे काही हमी नाही. जोपर्यंत तुमच्याकडे लसीच्या कार्यक्षमतेबाबत खरोखरच माहिती उपलब्ध नाही, तोपर्यंत ही लस मानवावर परिणामकारक ठरेल की नाही हे सांगणे अशक्य आहे. आमच्याकडे इम्युनोजिनीसिटीबद्दल अत्यंत प्रोत्साहन देणारा असा माहितासाठा आहे. आमच्याकडे प्राईम मॉडेल्सच्या अभ्यासातील चांगली माहिती आहे. त्यामध्ये असे दिसते की, त्या प्रणालींमध्ये मूल्यमापन केलेल्या काही लस गंभीर आजारांपासून बचाव करतात. हे सर्वकाही खूप चांगले आहे. परंतु अगोदर प्राण्यांवरील अभ्यासावरून दिशाभूल झाली होती. आता जोपर्यंत आमच्याकडे मानवी माहितीसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत मी यावर खात्रीशीरपणे सांगू शकत नाही.

मला नाही वाटत की, मी रशियन लसीला प्राथमिक टप्प्यात असलेली लस म्हणेल. ही एक लस आहे जी १७ जून रोजी सर्वप्रथम मनुष्याला दिली गेली. हे पहिल्या व दुस-या टप्प्यातील चाचण्यांद्वारे होते. याचाच अर्थ ते खूप कमी लोकांना दिली गेली. आम्हाला माहिती आहे की, लस तीव्र प्रतिक्रिया देत नाही व ती रोग प्रतिकारक आहे. म्हणून हेच सत्य आहे की, या लसीला एका प्राधिकरणाने परवाना दिला आहे. ते आपल्याला सांगत नाही की ही लस रोगापासून बचाव करण्यासाठी काय करेल. ते करण्यासाठी आपल्याला तिस-या टप्प्यातील कार्यक्षमता चाचणीची गरज आहे. चीनमध्येदेखील परवाना मिळालेल्या लसीबाबत ते खरे आहे; कार्यक्षमतेच्या माहितीशिवाय मी ती लस घेण्याबद्दल विचार करणार नाही.

इंजिनिअरिंग परीक्षा स्थगितीस नकार; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या