हैदराबाद : तेलंगणाच्या हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघ निवडणुकीत अभाविप, एसएफआय सदस्यांत हिंसक धुमश्चक्री उडाली. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. शुक्रवारी रात्री दोन गट समोरासमोर आले. एसएफआयने अभाविप आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात हिंसक कृत्य केले.
त्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरीसह इतर धारदार वस्तूंचा वापर केल्याचा आरोप अभाविपने केला. एसएफआयनेही अभाविपवर आरोप केला. या निवडणुकीत पराभव होणार असल्याचे लक्षात आल्याने अभाविपने एसएफआयच्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला आणि त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला. पुरुषांच्या वसतिगृहात अभाविपने एसएफआयच्या सदस्यांवर हल्ला केल्याचाही त्यांचा आरोप आहे.