27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयमध्यप्रदेशातील नीमचमध्ये दोन समुदायांत संघर्ष

मध्यप्रदेशातील नीमचमध्ये दोन समुदायांत संघर्ष

एकमत ऑनलाईन

नीमच : देशातील वातावरण सध्या धार्मिक वादांवरुन तणावात आहे. अशातच धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना मध्य प्रदेशातील नीमचमध्ये समोर आली आहे. नीमचमध्ये दर्ग्याजवळ हनुमानाची मूर्ती बसवण्यावरून वादाचे प्रकरण समोर आले आहे. जुनी कचरी परिसरातील दर्ग्याजवळ हा वाद झाला. यानंतर परिसरात तणाव पसरला. हल्लेखोरांनी दगडफेक केल्यानंतर एक दुचाकीही जाळण्यात आली.
काँग्रेस नेते दिग्विजय स्ािंह यांनी या घटनेवर ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी घटना घडलेल्या परिसरात भाजप आमदाराचे घर घर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या वादाला आता नवा रंग लागण्याची शक्यता आहे.

९ जणांना अटक ; ४ जणांवर गुन्हा
तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी दुकाने बंद करायला लावली. तसेच, हल्लेखोरांना आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. प्रशासनाने नीमच शहर परिसरात कलम १४४ लागू केले आहे. दगडफेकीत नीमच सिटी टीआय जखमी झाले आहेत. त्यानंतर नीमचमध्ये बाजारपेठा पूर्णपणे खुल्या आहेत. आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जुनी कचरी परिसरात सुमारे पाच हजार चौरस फूट जागेवर दर्गा आहे. ही जमीन सरकारी असल्याचे सांगितले जाते. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या जमिनीलगतच्या जागेवर काही जणांना हनुमानाची मूर्ती बसवायची होती. त्यावर दर्ग्यात उपस्थित लोकांनी आक्षेप घेतला. दोघांमध्ये वाद सुरू झाला. रात्री आठच्या सुमारास वाद वाढत गेला. दोन्ही समाजाचे लोक जमले. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी एक दुचाकीही पेटवून दिली.

५ पोलिस ठाण्यांचा पोलीस बंदोबस्त
खबरदारीचा उपाय म्हणून ५ पोलिस ठाण्यांचे पोलिस दल या परिसरात तैनात करण्यात आले आहे. यासोबतच राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे. वज्र वाहनही तैनात करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या