34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयइंधन, गॅस दरवाढीवर राज्यसभेत गोंधळ

इंधन, गॅस दरवाढीवर राज्यसभेत गोंधळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसºया टप्प्यात सोमवार दि़ ८ मार्च रोजी संसदेचे कामकाज पुन्हा एकदा सुरू करण्यात आले़ परंतु, राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी खासदारांनी इंधर दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ अशा वेगवेगळ्या विषयांवर सरकारला घेरले. या मुद्यावर राज्यसभेत जोरदार हंगामा पाहायला मिळाला. त्यामुळे सदनाचे कामकाज तासाभरासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याचे दिसताच सभापतींनी सदनाचे कामकाज दुपारी १ वाजपर्यंत स्थगित करण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाल्यानंतर राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाझलेल्या किंमतींचा मुद्दा उचलून धरला. सदनाचे कामकाज स्थगित करत या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.
आज संपूर्ण देशातील लोक चिंतेत आहेत. आम्ही सभापतींकडे मागणी करतो की सदनाचे कामकाज स्थगित करून पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर चर्चा केली जावी. आज देशात पेट्रोल १०० रुपयांवर तर डिझेल जवळपास ८० रुपये प्रती लीटरवर पोहचले आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. नागरिकांना इंधन, गॅस दरवाढीसंदर्भात सरकारचे म्हणणे ऐकायचे आहे, असे विरोधकांनी म्हटले.

केवळ अत्यावश्यक मुद्यावर चर्चा
सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची मागणी अस्वीकार केली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून आपल्याला नियम २६७ नुसार कार्यस्थगनाची नोटीस मिळाली आहे. परंतु, नियम २६७ नुसार सदनाचे सामान्य कामकाज स्थगित करून केवळ एखाद्या अत्यावश्यक मुद्यावर चर्चा केली जाते. त्यामुळे ही मागणी अस्वीकार केली जात आहे, असे शून्यकाळात नायडू यांनी म्हटले. चालू सत्रात विनियोग विधेयकावरील चर्चेदरम्यान आणि इतर वेळेस सदस्य या संदर्भात आपले म्हणणे मांडू शकतात, असेही नायडू यांनी म्हटले. सभापतींकडून मागणी फेटाळल्यात आल्यानंतर विरोधकांनी संसदेत जोरदार गोंधळ घातला.

ग्रामीण महिलांना उद्योजक घडवण्यासाठी गुगलचा पुढाकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या