24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे संसदेत आंदोलन

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे संसदेत आंदोलन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतक-यांनी गुरूवार दि़ २२ जुलै दिल्लीत संसद मार्चची सुरुवात केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर शेतकरी संसदद्वारे केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. तर, तिकडे काँग्रेस खासदारांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वात हे कायदे परत घेण्याच्या मागणीसह आंदोलन केले. संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनात दोन्ही सभागृहातील काँग्रेस नेत्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी नेत्यांनी काळे कायदे परत घ्या आणि पंतप्रधान न्याय करा, अशा घोषणा दिल्या.

या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर शेतक-यांनी आंदोलन पुकारल आहे. दिल्ली सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर दररोज २०० शेतकरी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जंतर-मंतरवर सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करतील. शेतक-यांच्या आदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जंतर-मंतर संसदेपासून काही अंतरावर असल्यामुळे पोलिस आणि सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम)ला एक शपथपत्र देण्यास सांगितले आहे. त्यात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन आंदोल केले जाईल, असे लिखीत असेल. यापूर्वी, २६ जानेवारीला शेतक-यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान राजधानीत मोठा हिंसाचार झाला होता. लाल किल्यात घुसून अनेक आंदोलकांनी पोलिसांनाही मारहाण केली होती.

सगळे लक्षात ठेवले जाईल : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी आज गुरुवारी एक ट्विट करत सरकारच्या या दाव्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सगळे लक्षात ठेवले जाईल, त्यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेसंदर्भातील माध्यमांमधील बातम्यांचा हवाला देत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. गेल्या मंगळवारी राज्यसभेमध्ये सरकारने आपल्या एका लिखित उत्तरात म्हटले आहे की, कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये कोणत्याही राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णाचा मृत्यू झाला नाही आहे.

भारतीय मुळातच ‘बाहुबली’!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या