22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदेशाच्या फाळणीवरून काँग्रेस-भाजपा आमनेसामने

देशाच्या फाळणीवरून काँग्रेस-भाजपा आमनेसामने

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताच्या दुस-या विभाजन विभीषिका स्मृति दिवसानिमित्त, भाजपने काँग्रेस पक्षावर निशाणा साधत एक व्हीडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये भाजपने १९४७ च्या घटनांवर आपली आवृत्ती जारी केली आहे. सात मिनिटांच्या या व्हीडीओमध्ये भारताच्या फाळणीसाठी जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरण्यात आले आहे. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्माण करण्याच्या मागणीला बळी पडल्याचा ठपका नेहरूंवर ठेवण्यात आला आहे.

या व्हीडीओवरून काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, १४ ऑगस्ट हा फाळणी विभिषिका स्मृती दिन म्हणून साजरा करण्यामागील पंतप्रधानांचा खरा हेतू आपल्या राजकीय फायद्यासाठी अत्यंत वेदनादायक ऐतिहासिक घटनांचा वापर करणे हा आहे.

त्याचवेळी ते म्हणाले, आधुनिक काळातील सावरकर आणि जीनांचे देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत. गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, १९४७ च्या फाळणीदरम्यान भारतीयांनी भोगलेल्या दु:खाची आणि बलिदानाची देशाला आठवण करून देण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी विभिषिका स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जाईल. रविवारी सकाळी पंतप्रधान मोदींनीही याबाबत ट्विट केले आहे.

भाजपचा व्हीडीओ ज्यांच्या विभाजनाचा नकाशा जवळपास पंजाब आणि बंगालला अर्ध्या भागात विभाजित करतो. यासोबतच भारतीय सांस्कृतिक वारशाची माहिती नसलेल्या व्यक्तीला अवघ्या काही आठवड्यात भारताचे विभाजन कसे होऊ दिले, असा प्रश्नही विचारण्यात आला. फाळणीची भीषणता सांगणा-या व्हॉइस-ओव्हरसह नेहरूंचे व्हिज्युअल संपूर्ण व्हीडीओमध्ये दाखवले आहेत.

भाजपने हा व्हीडीओ ट्विट करून लिहिले की, ‘ज्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा, सभ्यता, मूल्ये, तीर्थक्षेत्रांची माहिती नव्हती, त्यांनी अवघ्या तीन आठवड्यांत शतकानुशतके एकत्र राहणा-या लोकांमधील सीमारेषा आखून दिली. या फुटीरतावादी शक्तींविरुद्ध लढण्याची जबाबदारी त्या वेळी कुठे होती?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या व्हीडीओवर जोरदार प्रहार करत एकामागून एक ट्विट केले आणि ते म्हणाले की, सत्य हे आहे की दोन राष्ट्राचे तत्व सावरकरांनी दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या