21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयकाँग्रेस संसदेचे कामकाज सुरळीत होऊ देत नाही

काँग्रेस संसदेचे कामकाज सुरळीत होऊ देत नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच, काँग्रेसवर सभागृह सुरळीत चालू देत नसल्याचा आरोपही केला. याशिवाय, कोविड-१९ महामारीवर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत स्वत: बहिष्कार टाकून इतर पक्षांनाही बैठकीत येण्यापासून रोखले, असेही मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी भाजपा खासदारांना काँग्रेस आणि विरोधकांची कामे जनता आणि मीडियासमोर एक्सपोज करण्यास सांगितले.

पेगासस हॅकिंग आणि नवीन कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवरुन काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे सोमवारी राज्यसभेची कारवाई सहावेळ स्थगित करावी लागली. विरोधकांनी हातात पोस्टर घेऊन दिवसभर संसदेत गोंधळ घातला. विरोधकांनी स्पायवेयर फोन हॅकिंग प्रकरणावर चर्चा करणे आणि याचा तपास करण्यासाठी उच्च स्तरिय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, या मगाण्या पूर्ण होईपर्यंत संसदेची कार्यवाही चालू देणार नाहीत, असा इशाराही दिला.

दोन विधेयक मंजूर
विरोधकांनी लोकसभेतही प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळादरम्यान सरकारने सोमवारी दोन विधेयक द फेक्­टरिंग रेगुलेशन (अमेंडमेंट) बिल २०२१ आणि नॅशनल इंस्­टीट्यूट ऑफ फूड टेक्­नोलॉजी एंटरप्रिन्­योरशिप अँड मॅनेजमेंट बिल २०२१ मंजूर करुन घेतले. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै रोजी सुरू झाले आहे. पहिल्याच दिवसापासून विरोधक महागाई, कृषी कायदे, पेगासस गुप्तहेरी आणि इतर मुद्यांवर सरकारवर निशाणा साधत आहेत. या गोंधळामुळे एक दिवसही संसदेचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.

ऑगस्टमध्ये लहानांना लस?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या