22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकॉंग्रेस नेते रडारवर, ईडीची पुन्हा नोटीस

कॉंग्रेस नेते रडारवर, ईडीची पुन्हा नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. अधिका-यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना पुढील काही आठवड्यांत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, तर काहींना यंग इंडियाला दिलेल्या देणग्यांबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत चार नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत ईडीने त्यांची चौकशी केल्याचे सांगितले होते. त्यांनी यापूर्वी कंपनीसोबत केलेल्या काही व्यवहारांबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीने शिवकुमार आणि त्यांच्या भावाकडून यंग इंडियाला दिलेल्या देणग्यांबाबत चौकशी केली होती.

शिवकुमार म्हणाले की त्यांनी एजन्सीकडे त्यांच्या मालमत्तेचा तपशील देण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काही महिन्यापूर्वी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र खासदार राहुल गांधी यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांची चौकशी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या