30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयमाजी पंतप्रधानांचा लसीकरणाचा सल्ला काँग्रेस नेत्यांनी ऐकावा

माजी पंतप्रधानांचा लसीकरणाचा सल्ला काँग्रेस नेत्यांनी ऐकावा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योजल्या जात असलेल्या उपाय योजनांचा उल्लेख करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या पत्राला उत्तर देताना काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांना लसीकरणाचे महत्त्व समजते. परंतु, त्यांच्या पक्षाचे इतर नेते त्यांच्या विचारांशी सहमत नसतात, असा टोला लगावला आहे.

हर्षवर्धन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाविरोधात लढताना लसीकरणाचे महत्त्व मनमोहन सिंग जाणतात. पण हे अत्यंत दुर्दैवी आहे की, त्यांच्याच पक्षाचे जबाबदार पदावर असलेले नेते मात्र त्यांच्या मताशी सहमत नसतात. हे अत्यंत दु:खद आहे की, काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या शास्त्रज्ञ आणि लस उत्पादकांचे आभार मानण्यासाठी एक शब्दही काढला नाही. विकसनशील देश असतानाही दोन लस असणे भारतासाठी अभिमानाची गोष्ट नाही का ?, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे अनेक नेते लसीबाबत खोट्या बातम्या पसरवतात आणि लोकांच्या जिवाशी खेळत राहतात. काही काँग्रेस नेत्यांनी तर सार्वजनिकरित्या लसीवर टीका केली आणि स्वत: गूपचूप लस घेतली, असेही त्यांनी म्हटले.

मनमोहन सिंग यांनी दिला लसीकरण तीव्र करण्याचा सल्ला
मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून लसीकरणाची मोहीम तीव्र करण्याचा सल्ला दिला होता. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. किती लोकांना लस दिली आहे. यावर लक्ष केंद्रीत न करता लोकसंख्येच्या किती टक्के लोकांचे लसीकरण झाले याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने रविवारी १६ जणांचा मृत्यू तर नवीन ४७७ रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या